Ad will apear here
Next
चविष्ट पदार्थांची मेजवानी
साधे, सरळ, सोपे, पण उत्तम आणि चविष्ट पदार्थ घरच्या घरी बनवण्यासाठी ‘झटपट बनवा’ हे पुस्तक चांगले मार्गदर्शन करते. विशेषतः उपवासाच्या पदार्थांसाठी हे पुस्तक खास ठरते. व्यग्र दिनक्रमात नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या गृहिणींसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. त्या पुस्तकाचा हा परिचय...
...............
आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय व्यग्र दिनक्रम असणाऱ्या नोकरदार गृहिणींना घर आणि काम अशा दोन्ही पातळ्यांवर खरं उतरायचं असतं. अशा वेळी नित्यक्रम सांभाळून घरच्यांसाठी, मुलांसाठी त्यांच्या आवडीचे, नवीन नवीन पदार्थ घरी बनवणं हेदेखील जमावं लागतं. हे करण्यासाठी सुटसुटीत रेसिपी असलेलं एखादं पुस्तक हातात असेल, तर ते अधिक सोपं होतं. अशा वेळी उपयोगी ठरेल, यासाठीच‘झटपट बनवा’ हे पुस्तक प्रभा प्रभुणे यांनी लिहिलं आहे.

उपवासाचे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आणि विविध प्रांतांतील काही चविष्ट पदार्थ घरी बनवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. प्रभा प्रभुणे यांचं हे पहिलंच पुस्तक असलं, तरी वाचकांना नेमकं काय पाहिजे असतं याचा नीट अभ्यास करून त्यांनी हे लिहिलंय, असं लक्षात येतं. साधे, सोपे, सहजपणे, कमी खर्चाचे, घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांतून बनवता येणारे असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ यात दिले आहेत. यातील रेसिपी काही वाचून, काही स्वतःच्या मनाने, काही ओळखीच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलेल्या अशा पद्धतीने एकत्र करून दिल्या आहेत.

शेव, चिवडा, चकली, धिरडी, थालीपीठ, वडे व भजी, लोणची, चटणी, रायते याचबरोबर कोकणी पदार्थ, गुजराती, राजस्थानी, कर्नाटकी, वऱ्हाडी, नागपुरी, सोलापुरी, मराठवाडी अशा विविध प्रांतांतल्या विविधरंगी पदार्थांची मेजवानी या पुस्तकातून मिळते. विशेष म्हणजे उपवासाचे गोड पदार्थ आणि इतर पदार्थ या विभागामध्येही जवळजवळ ५० पदार्थांचा समावेश आहे. काही नवे, हटके तर काही जुने, विस्मरणात गेलेले, पण चविष्ट पदार्थ, जे घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून अगदी पटकन व सहज होऊ शकतील, ते यात आहेत, हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे घरातल्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचायलाच हवं.

पुस्तक : झटपट बनवा 
लेखिका : प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे
प्रकाशक : सुकृत प्रकाशन 
पृष्ठे : ११८ 
मूल्य : १६० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNMBK
Similar Posts
झटपट बनवा ‘झटपट बनवा’ या पाककृतीविषयक पुस्तकाचा परिचय
कर्दळीवन एक अनुभूती... कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणी श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. या ठिकाणाला भेट दिल्यावर एक वेगळी, दिव्य अनुभूती होते, असे दत्तभक्त सांगतात. दुर्गम, सोयीसुविधांचा
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
एडिसन थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकले की बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, चित्रपट अशा अनेक गोष्टी आठवतात, ज्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. एक हजार ९३ पेटंट त्यांनी मिळवली होती, अशी माहिती देऊन थोर वैज्ञानिक व अमेरिकेचे लोकनायक ठरलेल्या एडिसन यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न 'एडिसन अदृश्य नियमांचा ज्ञाता'मधून केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language